Monday, July 30, 2007

मी.......

रंगात जीवनाच्या मिसळून वाहिले मी,
कळले मला न काही का धुंध जाहले मी

गंधात त्या फुलांच्या, स्पर्शात त्या कळ्यांच्या,
आकाश तारकांच्या संगतीत राहिले मी

ऐकून गूज गाणी, हळुवार हासले मी,
समजून शब्द सारे हरपून राहिले मी

स्मरुनी कधी तुला मी, रचिली नवी कहाणी,
विसरून भान सारे, जणू स्वप्न पाहिले मी

हस्ता कधीच रुसले, रुस्ता कधीच हसले,
ऊन पावसाचा खेळ पाहिला मी

डोळे भरून येता, मिटले हळूच डोळे,
भानावर येता कळले, आसवानी चिम्ब गेले भिजून मी.......

No comments: