एका चोठ्याश्या गवत नदी पलिकडे एक जुने मंदिर. गावातल्या एका मुलीचा रोजनियम कि संध्याकाळी पेटविलेला दिवा हातात घेऊन नदिपार करून तो मंदिरात ठेवणे। माहिती नाही आयुश्याची किती वर्षे प्राणा पलीकडे जप्लेला। एक विचित्र संध्याकाळ। दुपारी पासूनच ढ़ग दाटून आलेले। जोराचा वारा सुटलेला। झाडाचे पान फान्दीवर थाम्बेल तर शपथ। विजांचा नाच चाल्लेला। नदिने तर समुद्राचे रौद्र रुप धारण केलेले। एकुणच सारे काही सैरभीर। बिचारी मुलगी गोंधळून जाते । पण पेटविलेला दिवा नदिपार मंदिरापर्यंत कसा घेऊन जायचा? मध्येच दिवा शांत झाला तर प्राणच संपले सारे। याच एका जिद्दीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत मुलगी नदी पार करायला सुरुवात करते। निसर्गाला अजुनच चेव चढ़तो। नादीत्ल्या लाटांचे तुषार दिव्याच्या ज्योतीशी स्पर्धा करायला लागतात। बेफान वारा झाक्लेल्या हाताच्या पोकळीतून आत शिराय्ला बघ्तो। सगळेच शत्रू बनून समोर ठक्तात। पण जिद्द मात्र मोठी। मदिरात दिवा ठेव्ण्याची। शेवटी उम्बर्ठा ओलांडून आत येते। "जिंकलो एक्दाचे। किती अडचणी पार करून 'मी' हां दिवा इथ्वर आणला। चला माझ्या कर्तुत्वाचा आनंद व्यक्त करुयात"। एक इव्लासा सुस्कारा.........................................दिवा शान्त होतो !
एक, फक्त एक मोहाचा क्षण आणि सर्व काही सम्पून जाते। त्या मोहाच्या क्षणावर विजय मिळ्वून जर आपण पुढे गेलो तर ह्याही पेक्षा सुन्दर , आश्वासित आणि अमर्याद आयुष्य आपण उपभोगु शकतो। आवश्यकता आहे ती त्या मोहाच्या क्षणाला बळी ना पडण्याची।
अन्यथा शिल्लक राहील फक्त भोगणे
---Courtesy : A Long Lost Friend
Tuesday, May 8, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment